, , ,

शब्ददीप दिवाळी अंक – २०२४_ Shabddeep Diwali Ank 2024

200.00

साहित्य जगत शब्ददीप दिवाळी अंक – २०२४ 
मुख्य संपादिका
सौ. गीता भगवान राईतकर
कार्यकारी संपादक
१) रामदास राजेगांवकर
२) प्रा.सौ.शारदा श्रीकृष्ण वानखेडे-चोपडे
३) कलानंद जाधव
सहसंपादक
१) प्रा‌.सौ.वर्षा विलास कावरे
२) रत्नाकर बाबुराव पाटील
३) सौ.सुवर्णा व्यंकट मुळजकर
४ ) प्रा.सौ.आशा सचिन भावसार
५) डॉ. अभिमन्यू मगर
६) ज्ञानदेव मानवतकर
अतिथी साहित्य संपादक व व्यवस्थापक
भगवान राईतकर
मुखपृष्ठ फोटो
कु. संस्कृती विलास कावरे
कु. श्राव्या दीपक राजेगांवकर
अक्षर जुळवणी
अक्षरशिल्प प्रकाशन, अमरावती
मुद्रण
गजानन काटे, वैदही ग्राफिक्स 
पृष्ठ संख्या – ९०
स्वागत मूल्य – २०० रु.

प्रत्येक व्यक्ती हा एकमेकावर अवलंबून आहे. समाजातील गरीब व्यक्ती जसा श्रीमंत व्यक्तीवर अवलंबून आहे. तसाच श्रीमंत व्यक्ती हा गरीब व्यक्तीवर अवलंबून आहे. समाजामध्ये प्रत्येकाला एकमेकाची गरज आहे. त्यामुळे समाजात कोणी लहान नाही तर, कुणी मोठा नाही. सर्वजण आपल्या ठिकाणी मोठेच आहेत. याची जाणीव ठेवत दिवाळीच्या या शुभ पर्वावर समानतेचा आणि मानवतेचा दीप आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये प्रज्वलित करण्याची गरज आहे. त्यामधून समाजामध्ये असलेली मानसिक विषमता नष्ट होईल आणि समानतेसोबत आनंदाची दिवाळी साजरी करता येईल. दिवाळी हा सण केवळ अमावस्यामध्ये दिवा लावण्यापुरता मर्यादित आहे असे म्हणता येणार नाही. तर, अविचाराचा अंधार जो आपल्या हृदयात, आपल्या समाजात आणि आपल्या अवतीभवती पडलेला आहे. त्याला ज्ञानाचा, स्नेहाचा आणि आपुलकीचा दीप लावून दूर करणे म्हणजे दिवाळी साजरी करणे होय, असे म्हणता येईल. संत साहित्यामध्ये संतसंग, सत् संग, ज्ञान, स्नेह, समानता, बंधुभाव, सुविचार आणि सदाचार अशा प्रकारच्या तत्वाचे आचरण करून दिवाळी साजरी करण्याचा विचार पहावयास मिळतो. दिवाळी म्हणजे आपल्यातील अहंकार दूर करून आपल्यामध्ये सदाचार निर्माण करण्याचा एक शुभ मुहूर्त होय, असे म्हणता येईल. बंधुता, समता आणि एकात्मता याचा दीप प्रज्वलित करून आपण दिवाळी साजरी करूया! साहित्य जगत या मासिकाचे वर्गणीदार, जाहिरातदार, हितचिंतक, कवी, कवयित्री व साहित्यिक या सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ! (संपदकीयतून)

Weight 200 g
Dimensions 0.5 × 7.5 × 9 in

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शब्ददीप दिवाळी अंक – २०२४_ Shabddeep Diwali Ank 2024”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top

My wishlist

Your wishlist is currently empty.