शामल नभास बघुनी चंचल तरंग होतो… पंखास फडफडूनी उडता विहंग होतो…
गानात श्रीहरीच्या तल्लीनसा निरंतर, भक्तीरसात बुडुनी गाता अभंग होतो…
रंगात आसमानी होतो सुनील जैसा, पावून ती निळाई गानात दंग होतो…
रेखीव निरद व्योमी जैसे अबीर उडते, ओढून रंग त्यांचे उडता पतंग होतो…
रंगून सर्वरंगी स्पर्शन ते नभाला, स्वच्छंद विहरतासा भरता उमंग होतो…
Reviews
There are no reviews yet.