माझ्या चहूबाजूने अंधार पसरला होता मला उजेडाची नितांत गरज भासू लागली चाचपडता चाचपडता त्या अंधारात मला गवसली एक मेणबत्ती जवळच पडलेली माचिस सुद्धा गवसली मला मेणबत्ती पेटवून मी उजेड उभारला माझ्या आसपास तरी भागली नाही माझी भूक उजेडाची मी पेटवले मेणबत्तीचे दुसरे टोकही आणि उपभोगू लागलो दुप्पट उजेड दुप्पट उजेडासाठी मी धरली मेणबत्ती मधोमध चिमटीत दोन्ही पेटते टोक पेटत पेटत लवकरच माझ्या चिमटीला चटका देऊन गेले मी पेटती मेणबत्ती दिली भिरकावून विझली अशा फेकाफेकीत ती मेणबत्ती आणि पसरला पुन्हा अंधार माझ्या चहूबाजूने तेव्हापासून मी अंधारातच प्रतीक्षा करतोय उजेडाच्या स्वयंभू आगमनाची…
Aksharshilp Prakashan, Marathi, Poem
मुजोरी न गझलांची- Mujori N Gazlanchi by Lakhansih Katare
Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00.
Reviews
There are no reviews yet.