Sale!
, , ,

गझल माया- Gazal Maya by Siraj Shikalgar

Original price was: ₹200.00.Current price is: ₹160.00.

“गझल माया” संग्रहाचे मनःपूर्वक स्वागत

मानवी स्वभावाचा, वृत्तींचा, सद्भावनांचा, सामाजिक वास्तवाचा तसेच अंतर्मुख होऊन स्वतःच्या गुणदोषांचा देखील अगदी अचूक वेध घेताना शद्वांना धार लावून अगदी सहजपणे आपल्या गझल मधून प्रकाशित करणारे व्युत्पन्नमती गझलकार आदरणीय श्री. सिराज शिकलगार यांचा “गझल माया” हा गझलसंग्रह वाचणे एक पर्वणीच आहे.

विशेष म्हणजे गजल माया या संग्रहाला गजलवर मातृवत प्रेम करणारे ज्येष्ठ-श्रेष्ठ गझलकार आदरणीय ए. के. शेख सर यांची प्रस्तावना लाभली आहे. या संग्रहातील प्रत्येक गझल व शेर आपापल्यापरीने संदेश वाहक आहेत. आनंद, दुःख, वंचना, यश-अपयश, फसवणूक अशा संमिश्र जीवनानुभावे दर्शन घडविणारे आहेत.

सिराज शिकलगार यांनी लिहिलेल्या गजलातील आशय नुसता लांब-रुंद नाही तर त्याला अर्थांतराची खोली व उंची लाभलेली आहे. वाचकाला अंतर्मुख करावयास लावणारा असा हा संग्रह आहे. “गझल माया” चे स्वागत व सिराज शिकलगार यांना हार्दिक शुभेच्छा.

Weight 200 g
Dimensions 0.5 × 14 × 22 in

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गझल माया- Gazal Maya by Siraj Shikalgar”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top

My wishlist

Your wishlist is currently empty.