सिराज करीम शिकलगार, वृत्तबद्ध कविता तसेच मराठी गझलच्या क्षेत्रात स्थिरावत असणारं नाव. पलूस तालुक्यातील आंधळी सारख्या छोट्या खेडेगावात राहून सिराजभाई गेली अनेक वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने व प्रयत्नपूर्वक वृत्तबद्ध कविता, गझल व लयींचा अभ्यास करत आहेत व आपली काव्यभूमिका ते कविता अन् गझलामधून मांडत आहेत. आपला सभोवताल व त्यातील माणूस, माती, पाणी, शेती, पाऊस व एकूणच सगळ्या व्यवस्थेचे अंतरंग व बाह्यरंग ह्यानी हा संग्रह भारलेला आहे. सिराजभाई हेच मुळात एक चांदण्यानी भारलेले झाड आहे, त्यामुळेच ते लिहू शकतात की…
ओंजळीत चांदणे भरून घे जरा सखे ।। चांदण्यात प्रेम तू करून घे जरा सखे त्यांचा गझलच्या मतल्यात आलेला जरा शब्द खूप काही सूचित करून जातो. तो काळाचे भान तर ठेवतोच आहे पण आपल्याही कालमर्यादा दर्शवतो आहे. रोजच्या बोलण्यावर दख्खणीचा प्रभाव असूनही सिराज यांच्या गझलेने उत्तम मराठी अंगिकारली आहे, हे विशेष आहे.
सिराज यांचे सामाजिक भान किती टोकदार आहे ते दर्शवणारा शेर पहा… स्वप्नात काल माझ्या आला विकास होता ।। स्वप्नात का असेना संतोष फार झाला वास्तवात ध्वस्त झालेला समाज स्वप्नातील सुविधानीही आनंदी होऊ लागतो हे वलंत सत्य ह्या शेराने भाल्याच्या टोकावर आणले आहे.
एकूणच हा संग्रह वाचनिय व वेगवेगळ्या वृत्तानी व मिश्र वृत्तानी संपन्न असा
गला आहे. गझलगीत या त्यांच्या संग्रहासाठी मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो व त्यांच्याच एका राने सांगता करतो… वाढवा प्रतिकारशक्ती सल्ले खुशाल देता ।। हे रिकामे पोट आम्ही सांगा कसे भरावे.
Reviews
There are no reviews yet.