Sale!
, , ,

गझलगंध-GazalGandha by Siraj Shikalgar

Original price was: ₹150.00.Current price is: ₹120.00.

दरवळणारा गझलगंध

क्षणाक्षणाला नटते जीवन, पळपळाला घटते जीवन

असा वास्तववादी शेर लिहणारे श्री. सिराज शिकलगार यांचा हा पाचवा गझलसंग्रह ज्याचे शीर्षक आहे गझलगंध. अस्सल खेड्याच्या मातीचा, नात्यांचा, कुटुंब व्यवस्थेचा, पिकांचा, पाण्याचा, प्रेमाचा गंध घेऊन येणाऱ्या ह्या गझलसंग्रहाचे मी स्वागत करतो. सात कवितासंग्रह व पाच गझलसंग्रहह नावावर असणारे सिराजभाई…

झालेत ओळखीचे सारेच रंग आता, रंगात आज माझ्या सारेच दंग आता

असा शेर लिहताना ते गझलेशी एकरूप झालेले दिसतात. अनेक मिश्रवृत्तांचा एक रंग करून त्याचा गझलगंध ते रसिकांपुढे, वाचकांपुढे ठेवत आहेत. काव्यनिष्ठा व आत्मनिष्ठा यांचा सुरेख संगम असलेले सिराजभाई तितक्याच प्रामाणिक निष्ठेने गझलरचना करत आहेत व आपले अंतरंग, आपले आत्मभान व आपला भवताल गझलेत आणत आहेत. त्यांचे स्वतःचे असे एक आध्यात्म संग्रहात प्रखरपणे जाणवते आहे. साधीसोपी नांडणी, अनेक वृत्तावरची हुकूमत, माधुर्य, मार्दव, कळकळ आणि आर्तस्वर ही रचनांची वैशिष्ट्ये जाणवतात. त्यांच्या गझलेने सर्वच विषयाना गवसणी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे गझलेला कोणताच विषय वर्ज्य नसतो याचा प्रत्यय या संग्रहातून येतो.

ते स्वतः नुसत्या उपदेशकाच्या भुमिकेत न वावरता ते स्वतःला या संग्रहात वितळवून घेत आहेत, त्याचा प्रत्यय देणारे अनेक शेर या संग्रहात आहेत…

स्मशानाकडे पाय माझे जसे वळू लागले, वृथा जीवनाचे खरे अर्थ मज कळू लागले असा प्रामाणिक आर्तस्वर ते आळवताना दिसतात. ही प्रामाणिक आत्मनिष्ठाच यांना पार करेल ह्यात शंका नाही. मी त्यांच्या या गझलसंग्रहास मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

Weight 150 g
Dimensions 0.5 × 14 × 22 in

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गझलगंध-GazalGandha by Siraj Shikalgar”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top

My wishlist

Your wishlist is currently empty.