Sale!
, ,

काय समाजलीव- Kay Samajliv by Varsha Thukrul

Original price was: ₹180.00.Current price is: ₹150.00.

SKU: V195 Categories: , ,

वर्षाचं लिखाण म्हणजे मला तिच्या विनोदी स्वभावाचा आरसा वाटतो. त्या आरशा पलीकडचे दुस्तर जगणे ती विनोदाच्या अस्तराखाली खूप सहज लपवू शकते. गंभीर लिखाणाच्या तुलनेत विनोदी लिखाण नेहमी ‘हलक्यात’ घेतलं जातं. विनोदी लिखाणात पुरुषवर्गाची मक्तेदारी असताना विनोदी लिहिणाऱ्या स्त्रियांचं लिखाणही हल्ली तितक्याच खिलाडूवृत्तीने वाचलं जातंय. ही साहित्याच्या एका नवीन पर्वाची सुरुवात आहे असं मला मनापासून वाटतं.

वर्षाच्याच भाषेत सांगायचं झालं तर ती म्हणते, ‘शब्द अश्लील कधीच नसतात ताई, वाचणाऱ्याच्या भावना कशा आहेत, त्याने कोणता चष्मा लावलाय त्यानुसार समीक्षा होत राहतात. आपण तर अस्तित्वात असलेलेच शब्द वापरतो ना? लोड नाही घायचा. लोकांना काय वाटावं हे आपल्या हातात नसतं गं ताई.’

मला तिच्या लिखाणातला बिनधास्तपणा आवडतो. कधी ‘फाट्यावर मारत’ ती विनोदाचे षटकार मारते. कधी मैत्रिणींची कानपिळणी, कधी खुद्द नवरोजींवर निशाणा साधत, तर कधी किंचित मिश्किल चिमटे काढत ती लिहिते. काहीवेळेस तिची लेखणी चोडी बेफाम होत असली तरी कुणाचे मन दुखावणे किंवा जिव्हारी लागेल असा तिचा विनोद नसतो हे विशेष. तिचे नेहमीचे विनोदी किस्से वाचून सहजच ‘बयो, पुस्तक काढ गं नाणि नाव दे काय समजलीव?’ असं म्हटलं होतं. तिने अगदी ते वाक्य मनात ठेवलं, उपलं. आर्थिक आणि तांत्रिक बाबी स्वतः सांभाळत आज दोन वर्षानंतर तिचं पुस्तक तंय.

वर्षा, दोन रोमँटिक पुस्तकांच्या प्रकाशनानंतर हे विनोदी पुस्तक प्रकाशित करणे एक नवीन पडाव आहे. आता थांबू नकोस. तुझी साहित्यिक प्रगती उत्तरोत्तर होतं वो, तू यशाची उंच शिखरे गाठत राहोस हीच सदिच्छा आणि आशीर्वाद !

जगण्यातला अवघडपणा विनोदी अंगाने साधा सरळ सोपा करण्याची कला ळ्यांनाच नाही जमत. काय समजलीव ?

Weight 180 g
Dimensions 0.7 × 14 × 22 in

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “काय समाजलीव- Kay Samajliv by Varsha Thukrul”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top

My wishlist

Your wishlist is currently empty.