कवयित्री, कादंबरीकार तसेच कथाकार स्मिता भोस्कर चिद्रावार यांच्या ‘एक नवी आशा’ या कथासंग्रहातून भावनेचा ओज आणि वास्तवाचे तेज झळकते. संस्कार सौदर्याचे पैलू प्रभांकित करण्याऱ्या ह्या कथासंग्रहात स्त्रीच्या भावना, तिच्या मनातील सल, तिला अजूनही वाटणारी नवथर, उत्सुकता आणि तिचा संयतपणा अशा विविध भावनांच्या कंगोऱ्यांना स्पर्शन स्त्रीच्या जगण्यातील बदललेले संदर्भ लेखिकेने चितारून स्त्री मन उलगडण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. सासूने सुनेला, मुलीने आईला, पतीने पत्नीला एकंदरित सीने स्त्रीला व पुरुषाने स्त्रीला समजून घेतांना मार्गदर्शक ठरावी अशी ही साहित्यकृती आहे. ‘एक नवी आशा’, ‘पैठणी’, ‘म्हातारी बाग’, ‘पारख’, ‘गीताई’, ‘घर एकटीचं?’, ‘ओळख अस्तित्वाची’ या सर्वच कथावस्तूंमधून भावनिक व मानसिक आंदोलनांचा निचरा करून हळूच एक संस्कार लेखिका स्मिता वाचकांच्या मनावर सोडतात. शब्दांचा कुठलाही फापटपसारा न करता अगदीच साध्या सोप्या शब्दात कथांमधून मोठा आशय मांडण्यात स्मितांची लेखणी यशस्वी ठरली आहे, यात तिळमात्रही शंका नाही. स्मिता यांच्या लेखणीतून असेच मौलीक उच्च दर्जाचे विचार पेरणारे साहित्य प्रसवू देत. तद्वतचः एक नवी आशा
मना मनात रुजावी,
निराशेच्या गर्तेत
ती आधार ठरावी.
Reviews
There are no reviews yet.