अनंगाचा स्पर्श – Annagacha Sparsh by Nayana Nitin
Original price was: ₹160.00.₹140.00Current price is: ₹140.00.
Author – Nayana Nitin
ISBN – 978-93-88939-53-9
Published by Aksharshilp Prakashan
Cover Design by Bali Khaire
MRP – Rs. 150/-
अंग- अनंग. अनंग म्हणजे अंग नसलेले काही. म्हणजे अस्पर्श. अस्पर्शाचा स्पर्श होणं म्हणजे काय हा प्रश्न पडला की कुठलीही कला हाच एक ‘अनंग स्पर्श’ असतो असं म्हणावं लागेल. नयना नितीन यांच्या ‘अनंगाचा स्पर्श’ या कविता संग्रहातल्या ९३ कविता या एका हळव्या मनाची साक्ष देणाऱ्या कविता आहेत. त्याचं आणि तिचं अशी दोन्ही व्यक्तीमत्त्व त्या उपभोगतात. पुरुष आणि स्त्री मध्ये • दोन्हींचा अंश फक्त ‘एक’ क्रोमोझोम कमी – असतो. म्हणूनच ‘त्यातली ती आणि तिच्यातला तो’ या दोघांच्या हृदयातून त्या जगण्याकडे पाहतात. आपल्यातच असलेले हे विभ्रम एखाद्या कोड्यासारखे कवितेतून सोडवत बसणं म्हणजे ‘अनंगाचा स्पर्श’ त्यांच्याच शब्दात सांगायचं तर…
नयनाच्या कविता म्हणजे तिच्या अंतरात्म्याच्या व्याकूळ नोंदी आहेत. ती म्हणते, ‘अचेतन मनाचा आरसा आहे. माझी कविता. या अचेतन मनाच्या खोल तळाशी वेदनेचं बीज आहे. कुठली तरी अनाम वेदना तिला क्षणोक्षणी हळवं करते. या वेदनेचा निचोड म्हणजे ही कविता ! एका नितळ मनाची कविता. नयनाची कविता शाश्वत जीवनमूल्यांचा निरंतर शोध घेत राहते. नयनाच्या प्रेमकविता, आठवणींच्या कविता अतिशय तरक व मोहित करणाऱ्या! काळाचे भान, परिवर्तनाचा ध्यास नी माणूसपणाचा गहिवर… हा या कवितेचा मूळस्वर आहे. व्यवस्थेविरुध्द दोन हात करू पाहणारी ही बंडखोर कवयित्री ! छंद-मात्रांचा तिला सराव असला तरी मुक्तछंदावर तिची हुकुमत आहे. गेयतेपेक्षा मुक्तछंदातूनच ती आपलं आत्मचिंतन खुलेपणानं, प्रगल्भपणे मांडते. नैतिक मूल्यांशी नयनाचं अतूट नातं आहे. सत्याच्या शोधाची व मानवी मनाच्या अनंतयात्रेची ती प्रामाणिक वाटसरू आहे. नयनाच्या या अनोख्या काव्यप्रवासांचं मला अपार कौतुक वाटते !
Reviews
There are no reviews yet.