गावापासून दोन अडीच कि. मी. अंतरावर छोटीशी वाडी, तिला जोडणारी पायवाट, वळणावळणाची, खड्डे खुड्डे आणि दगडधोंड्यांची, वाटेच्या दुतर्फा काटेरी झुडपे आणि दाट वाढलेले गवत, वाडीत राहणाऱ्या शेतकऱ्याला नेहमीच गावात यावे लागत असल्यामुळे त्याला ही पायवाट संपूर्ण पाठ, कुठे दगड, कुठे उतार, कुठे वळण हे सर्व माहीत असल्यामुळे त्याची मोटारसायकल या वाटेवरून जरादेखील न अडखळता धावत असते. सराईतपणे, वेळो-अवेळी, ऋतू परत्वे, शेतात पिकणारा भाजीपाला, कडधान्ये, फळे, धनधान्य इत्यादी वाण मोटारसायकलवर लादून तो शेतकरी गरजेनुसार विक्रीसाठी गावात आणीत असतो. सिराज शिकलगार हे अशा शेतकऱ्यासारखे कष्टाळू गझलकार आहेत. वर म्हटल्याप्रमाणे वाडीच्या शेतकऱ्याला गावाकडे जाणाऱ्या वाटेची जशी खडा-न-खडा माहिती, तशी या गझलकाराला कितीतरी वृतांची, अनेक विध वृत्तांचा त्यांचा गाढा अभ्यास आणि लगावली पाठ असल्यामुळे ते आशयाला अनुलक्षून तो अनुभव वृत्तात गोवतात. कुठलेही वृत्त त्यांच्यासाठी परिचित वाट असल्याने जीवनातील चढ-उतार प्रत्यक्ष भोगलेले, अनुभवलेले सुखःदुःखाचे प्रसंग, व्यवहारात समाजात, राजकारणात प्रत्यही घडणारे अनेक उलट-सुलट प्रसंग गझलकार सावधपणे हेरून त्यांना शेतकऱ्याने शेतातील माल मोटारसायकलवर लादावा त्याप्रमाणे गझलेवर लादून वृत्तांच्या सराईत वाटेने निघून रसिकापर्यंत पोहोचवितात. आयुष्याच्या विविध पैलूंना व्यक्त करणाऱ्या त्यांच्या लयबद्ध गझला रसिकाला लयीच्या वाटेवर तरंगायला लावून आशयाच्या परिपक्वतेचा आनंद देणाऱ्या आणि मराठी गझलेचे दालन समृद्ध करणाऱ्या आहेत.
Aksharshilp Prakashan, Gazal, Marathi, Siraj Shikalgar
गझल साया- Gazal Saya by Shiraj Shikalgar
Original price was: ₹200.00.₹160.00Current price is: ₹160.00.
Reviews
There are no reviews yet.