मराठी गझलच्या परिप्रेक्ष्यात सिराज करीम शिकलगार यांचा नाणखी एक गझलसंग्रह शामिल झाला आहे. त्या गझलसंग्रहाचे नाव झलसंध्या असे आहे. मनात साठवून ठेवलेल्या अनंत जखमांचे सर्जन या झलसंग्रहातील गझलांमधून झाले आहे. त्यामुळे मराठी गझल वाङमयास एक विश्वस्त गझलकार म्हणून त्यांची नोंद घ्यावी लागेल.
मराठी गझलचा लहजा अलिकडे बदलत आहे ही समाधानाची बाब
आहे. मराठी गझल स्वतःचा इश्किया तबियत चा परीघ ओलांडून आधुनिक
झलचा स्वभाव स्वीकारीत असल्याचे सिराज शिकलगार यांच्या गझला वाचत
सताना जाणवते. वर्तमान कालीन संदर्भ घेत ती स्वतःचे युगभाषिक अस्तित्व बद्ध करीत आहे. त्यामुळे सिराज शिकलगार यांची गझल जदीदी आणि रक्कीपसंद गझल लिहिणाऱ्यांच्या यादीत स्वतःचे नाव अधोरेखित करते आहे. सिराज शिकलगार हे अस्वस्थ गझलकार आहेत. स्त्रीविषयक वेदना ■णि सामाजिक भान हे त्यांच्या अस्वस्थतेचे कारण आहे. त्यांच्या मनात द्भवणाऱ्या चिंतनगाभ्यातील ही अस्वस्थता गझलरूप धारण करते. या स्वस्थतेवर लक्ष केंद्रित करीत शब्दांमधील अन्वर्थनाच्या नेणिवेपर्यंत होचण्याचा त्यांनी गझलसंध्या मधील गझलांमधून यशस्वी प्रयत्न केलेला हे. त्यांच्या या अभिव्यक्तीचे स्वागत गझलांचे अभ्यासक व वाचक करतील ना विश्वास त्यामुळेच येतो. सिराज शिकलगार यांच्या भावी साहित्यिक टचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा.!
Reviews
There are no reviews yet.