कला, मग ती कुठलीही असो तिचा सुचण्याचा आणि रुसण्याचा कालावधी कधीच कलाकाराच्या हातात नसतो. ते देणं न देणं ही त्या कलेचीच मक्तेदारी. त्यामुळे लेखणी कधी भरभरून प्रकटते तर कधी महिनोनमहिने मौन धारण करून बसते. पण एखादा कवी असा असतो की ज्याच्याकडून सातत्याने लिहिले जाते आणि वाचकांना उत्तम लिखाणाचा आस्वाद घेता येतो. असेच आहेत सातत्य कायम ठेवून गझल लिहणारे गझलकार आहेत सिराज शिकलगार. गझल हा तंत्रानुगामी काव्यप्रकार आहे. त्याची प्रत्येक ओळ ज्याला ‘मिसरा’ म्हणतात ती पहिल्या ओळीबरहुकूम त्याच वृत्तात लिहावी लागते. त्यामुळे एक एक शेर लिहिताना गझलकाराचा कस लागतो. मग अशी पूर्ण गझल लिहायला किती कस लागत असेल. सिराज शिकलगार यांनी आजवर तब्बल एक हजार गझल लिहिल्या आहेत आणि त्या विविध संग्रहातून प्रकाशितही झाल्या आहेत. यावरून त्यांचं गझलवरील प्रेम हे निष्ठेच्या पातळीवर पोहोचल्याचं दिसून येतं. म्हणूनच ते हणतात…..
उरी लपवल्या मी जरी खोल जखमा
गुपित खोलते ही गझल सांजवेळी
त्यांच्या गझल हजार या संग्रहासाठी खूप अभिनंदन आणि पुढील खाणासाठी शुभेच्छा.
Reviews
There are no reviews yet.