Sale!
, ,

संगीतसूर्य काव्यमाला- Sangeetsurya Kavyamala by Dr. Satish Pawade

Original price was: ₹100.00.Current price is: ₹70.00.

SKU: A369 Categories: , ,

नमिती तुज केशवा

शंभोधर गंगाधर गिरिजा गणराजा, नामितो तुज केशवा ।। धृ ।।

रंग देवतेचे तुजं आशिष, त्रिशुलधराचे तुला शिवाशिष गान देवता प्रसन्न तुजला, नमितो तुज केशवा ।। १ ।।

उंच स्वरांचे तुझेच गायन, कंठ पहाडी गगन ये भेदून रंगभूमिचा धैर्यधर, अर्जुन, नमितो तुज केशवा ।। २ ।।

दरबाराचा मोह नसे तुज, नाट्यकर्मी तू हेच तुझे व्रत सप्तस्वरांचे तुला स्वराशिष, नमितो तुज केशवा ।। ३ ।।

रंगभूमिचा तू उध्दारक, राष्ट्र भक्तिने होता प्रेरित दानधर्मी तू नवसंशोधक, नमितो तुज केशवा ।। ४ ।।

संगीतसूर्य तू रंगभूमिचा, प्रसाद तुजला ओंकाराचा कंठी कौस्तुभ मनि रसिकांचा, नमितो तुज केशवा ।। ५ ।।

पाच पांढरी मूळ तुझा स्वर, लखलखणारा तू स्वरभास्कर तुझ्या पूजना ये सिद्धेश्वर, नमितो तुज केशवा ।। ६ ।।

ललित कलांचा तू अभ्यासक, राग श्रुर्तीचा सुस्वर गायक मोहित होते रसिक तुझ्याकडे तुज केशवा ।। ७ ।।

स्त्री सन्मान अन उचनि

ना मनिही धरिता

देशभिमानी कला उपासका तुज केशवा ।। ८ ।।

संगीता सम अभिनय रंगत, संवादाची तुझी नवी रित ‘भोजराज’ हा शरण तुला नित, नमितो तुज केशवा ।। ९ ।।

रंगभूमिचा तुच धैर्यधर । गोपीचंद समशेर बहाद्दर ।

तूच अर्जुन, भरत, शंबुक । तूच सुभद्रा, शाहू, नारद । शहा-शिवाजी तूच धुरंधर। अभिनय गायन तुझेच सुंदर

Weight 100 g
Dimensions 0.5 × 14 × 22 in

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “संगीतसूर्य काव्यमाला- Sangeetsurya Kavyamala by Dr. Satish Pawade”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top

My wishlist

Your wishlist is currently empty.